27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeपरभणीबियाणे वापरण्यावर शेतक-यांनी भर द्यावा

बियाणे वापरण्यावर शेतक-यांनी भर द्यावा

परभणी : परभणी तालुक्यातील दैठ्णा मंडळातील पोखर्णी नृसिंह येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर घरचेच बियाणे वापरण्याचा जागर अभियानांतर्गत प्रगतशील शेतकरी मारोती वाघ यांच्या शेतात प्रात्यक्षिकासह जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सोयाबीन बियांणाची उगवण क्षमता चाचणी कशाप्रकारे घ्यावयाची याची माहिती प्रात्यक्षिकासह करुण दाखवली. तसेच कापूस, तुर, एमआरईजीएस अंतर्गत फळबाग, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, पी एम किसान सन्मान निधि योजना, पी.एम.के.एस.वाय कृषि यांत्रिकीकरण याबाबतीत सविस्तर माहिती विनोद जोशी यांनी सांगितली. त्यानंतर पी.एम. एफ. एम.ई माती परीक्षण, शेततळे बाबतीत मंडळ कृषी अधिकारी कैलास गायकवाड़ यांनी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शक म्हणून दैठणा मंडळ कृषि अधिकारी कैलास गायकवाड़, कृषि सहाय्यक विनोद जोशी, रोशन करेवार, शेखर आहेर यांची उपस्थिती होती. सरपंच डिगांबर एडके, उपसरपंच तथा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष ज्ञानोबा वाघ, प्रगतशील शेतक-यांसह विठ्ठलराव वाघ, बालासाहेब वाघ, सचिन वाघ, रुस्तुमराव वाघ, माणिकराव वाघ, शिवाजी भुमरे, दत्ता आसेवार, शाम मोधळ, संदीप मोधळ, लहू वाघ, नरहरि वाघ, राजेभाऊ वाघ, गणेशराव वाघ आदी शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृ.स. विनोद जोशी यांच्यासह गावातील प्रगतशील शेतकरी, ग्रामस्थ अदिनी परिश्रम घेतले.

जिल्हा कृषि अधिक्षक अनिल गवळी, उपविभागीय कृषी अधीक्षक रवी हरणे, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी विविध योजनांची मार्गदर्शनपर माहिती देण्यात येत आहे. परभणी तालुक्यातील १३१ गावात या योजनांची माहिती देण्यासाठी सर्व कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षकसह मंडळ कृषी अधिकारी, झरी मंडळ योगेश नीलवर्ण, शितल पौळ, (पिंगळी मंडळ) अविनाश खिल्लारे (परभणी मंडळ) यांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR