अर्धापूर : प्रतिनिधी
शेतमालाला भाव मिळत नसल्याने कर्जबाजारी झालेल्या शेतक-याने कर्ज कसे फेडायचे, या विंवचनेत सापडलेल्या दाभड येथील शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली.
मदन नामदेव सुर्यवंशी वय ६० असे या शेतक-याचे नाव असून ते दाभड येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. त्यांची जांभरून शिवारात शेती असून, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून होता. या शेतात आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातू-पणतू असा मोठा परिवार असून या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मयत मदन सुर्यवंशी यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नांदेड येथील ८० हजार रुपये कर्ज असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.