कळंब : प्रतिनिधी
मी कुटुंबासाठी काहीही करू शकलो नाही, मला माफ करा, लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले असते तर मी आत्महत्या केली नसती, अशी चिठ्ठी सोशल मीडियावर टाकून सोमवारी दि. १८ डिसेंबर रोजी पहाटे कळंब तालुक्यातील पिंपळगाव येथील तरूण शेतक-याने आत्महत्या केली. अण्णा काळे असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे.
सावकाराच्या कर्जाला कंटाळून व तेरणा सहकारी साखर कारखान्याने मदत न केल्याने कंटाळून पिंपळगाव डोळा ता. कळंब येथील तरुण शेतकरी अण्णा काळे यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी सोशल मीडियावर चिठ्ठी टाकली. त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी सावकार, तेरणा साखर कारखान्याचे संबंधित अधिकरी यांची नावे लिहून, त्यांनी कसा छळ केला, याची माहिती नमूद केली आहे. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनाही या पत्रातून आपल्या तेरणा साखर कारखान्याने जर मदत केली असती तर मी आत्महत्या केली नसती, असा उल्लेख केला आहे.