17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयशेतक-यांना शंभू बॉर्डरवर रोखले

शेतक-यांना शंभू बॉर्डरवर रोखले

पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या ४ जखमी

नवी दिल्ली : एमएसपी आणि विविध मागण्यांसाठी पंजाब-हरियाणा सीमेवर १०१ शेतक-यांची पथके सरकारवर दबाव आणण्यासाठी शंभू बॉर्डवरून दिल्लीच्या दिशेने निघाली आहेत. यावेळी सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांकडून शंभू सीमेवर शेतक-यांना अडवण्यात आले. यावेळी मोठा गदारोळ झाला. पंजाब-हरियाणा सीमेवर पोलिस अधिका-यांसोबत झालेल्या वादात काही शेतकरी जखमी झाले आहेत.

दिल्ली पोलिसांनी सुरक्षेसाठी शंभू बॉर्डरवर बॅरिकेट्स लावले आहेत आणि खिळेही ठोकले आहेत. शेतक-यांना रोखण्यासाठी त्यांच्यावर अश्रू धुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. शेतक-यांकडून सरकारच्या कृत्याचा निषेध केला जात आहे.

शंभू बॉर्डवर शेतकरी संघटना आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कींचा प्रकार घडला. यादरम्यान चार शेतकरी जखमी झाले आहेत. याशिवाय अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्यामुळे एक शेतकरी जखमी झाले आहेत. मात्र तरीही शेतकरी शंभू बॉर्डरवरुन जाण्यास तयार नाहीत.

पंजाब-हरियाणा सीमेवर मागील ९ महिन्यांपासून आंदोलनासाठी बसलेले शेतकरी आता दिल्लीकडे निघाले आहेत. सर्व शेतकरी संघटनांनी आपला मोर्चा दिल्लीकडे वळवला आहे. शेतकरी पायी चालत निघाले आहेत. आंदोलक शेतक-यांनी रस्त्यातील बॅरिकेड्स आणि काटेरी तारा उखडून टाकल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR