22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeक्रीडावेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने घेतली माघार

वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने घेतली माघार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या हंगामाला सुरुवात होत आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात चेपॉक मैदानावर सलामीचा सामना रंगणार आहे. या सामन्याची जय्यत तयारी सुरू असतानाच लखनौ सुपर जायंट्स संघाचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विली याने आयपीएल २०२४ च्या सलामीच्या लढतीतून माघार घेतली आहे.

दरम्यान आयपीएलचा थरार उद्या २२ मार्चपासून रंगणार असून यातच वेगवान गोलंदाज डेव्हिड विली याने वैयक्तिक कारणांचा हवाला देत खेळातून माघार घेतली आहे. लखनौ सुपर जायंट्सचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनीही यास दुजोरा दिला आहे. अर्थात डेव्हिड विली संपूर्ण स्पर्धेला मुकणार की सुरुवातीच्या सामन्यांना हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विलीच्या आधी इंग्लंडच्या मार्क वूड, जेसन रॉय आणि गस एटकिंसन यांनीही आयपीएलमधून माघार घेतली होती.

मार्क वूड याने आयपीएलमधून याआधीच माघार घेतली आहे, आणि आता डेव्हिड विलीही उपलब्ध नसेल. यामुळे गोलंदाजीत अनुभवाची कमतरता जाणवेल. मात्र आमच्याकडे चांगले टॅलेंट असून काही खेळाडू दुखापतीतूनही सावरत आहेत. शमार जोसेफ आणि मयांक यादवही आहे, ते चांगल्या गतीने गोलंदाजी करू शकतात, असे जस्टिन लँगर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR