24.6 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeलातूरआरक्षणासाठी मराठा क्रांतीचे आमरण उपोषण सुरु

आरक्षणासाठी मराठा क्रांतीचे आमरण उपोषण सुरु

लातूर : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करीत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा तसेच आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लावावा म्हणून लातूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने २९ ऑक्टोबरपासून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उषोषण सुरु करण्यात आले असून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. हर्षवर्धन राऊत, प्रमोद साळुंके, अभिमन्यू जगदाळे, अविनाश सूर्यवंशी व सिध्देश्वर जाधव हे आमरण उपोषणास बसले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे.

रविवारी सकाळी उपोषणकर्ते तसेच समाजबांधव व भगिणींनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळयाचे पुजन करुन अभिवादन केले. त्यानंतर ते उपोषण मंडपात आले व त्यांनी तेथील शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन केले. मराठा समाजाची अवस्था अत्यंत हलाखीची झाली असून ती दूर करण्यासाठी केवळ आरक्षणच हा समर्थ पर्याय आहे. मराठा समाजाचे दैन्य दिसत असताना व कुणबी हिच त्याची ओळख असताना सरकार आरक्षण देण्यास चालढकल करीत आहे. यामुळे तरुण निराशेच्या गर्तेत जात असून असा तेपोटी मरणाला कवटाळत आहेत. असे असतानाही सरकार संवेदना हरवल्यागत स्वस्थ आहे. सरकारला अजून किती जणांचे प्राण घ्यायचे आहेत, असा संतप्त सवाल आपल्या मनोगतातून यावेळी समाजबांधवांनी केला. अनेक भगिनींनीही आपल्या भावनांना वाट करुन देत मराठा आरक्षणाची अनीवार्यता विशद केली. आरक्षण मिळावे म्हणून आम्ही या लढ्यात सामिल झालो असल्याचे सांगत सरकारने आता वेळ न घेता मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करावे, अशी मागणी यावेळी सर्वांनी केली.

मराठा समाजाला आरक्षण तत्काळ देण्यात यावे, अशी सर्वच तरुणांची मागणी आहे. या मागणीसाठी सिद्धेश्वर भोसले या तरुणाने तीन दिवसांपूर्वीच तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण सुरु केलेले आहे. मराठा क्रांती मोर्चाने रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत उपोषण सुरु केले. त्यावेळी सिद्धेश्वर जाधव या तरुणास उपोषण मंचावर आणून त्याचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सिद्धेश्वर जाधव यांनी चौथ्या दिवशीीही आपले उपोषण सुरुच ठेवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR