31.2 C
Latur
Tuesday, April 22, 2025
Homeसोलापूरबावीच्या शेतकऱ्यांचे उपोषण

बावीच्या शेतकऱ्यांचे उपोषण

माढा : माढा तालुक्यातील बावी, तुळशी, परितेवाडी, पिंपळखुटे या गावांचा सिना माढा उपसा सिंचन योजनेत समावेश करण्यात यावे या मागणीसाठी पाणी संघर्ष समिती बावी च्या वतीने ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या नागपूर येथील यशवंत स्टेडियमवर साखळी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत मागण्या जाणून घेतल्या.

बावीसह अन्य गावे ही कायम दुष्काळी पट्ट्यात असून, गावांना पाण्याची दुसरी कोणतीही सोय नाही. गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे पाणी संघर्ष समिती बावीने वेळोवेळी आमदार, खासदार, जलसंपदामंत्री, अधिकाऱ्यांना या गावांचा समावेश सिना-माढा उपसा सिंचन योजनेत करण्याची मागणी केली होती.

त्यावर मंत्रालयात ४ ते ५ बैठकाही झाल्या. जलसंपदा मंत्र्यांनी ही गावे समावेश करण्याचे निर्देश हि ता. ३१ जानेवारीला दिले, परंतु, शासनाचे घोडे कोठे अडले आहे ते कळेना. अधिकारी समावेशनाचे पत्र काय काढेनात. या कारभाराला वैतागून पाणी संघर्ष समिती बावीच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. याठिकाणी जिल्हा दुध संघाचे संचालक शंभुराजे मोरे, मुन्नाराजे मोरे, पाणी संघर्ष समिती बावीचे अध्यक्ष सुरज मोरे, उपाध्यक्ष परशुराम मोरे, सचिव परेश मोरे, सहसचिव रोहित मोरे कार्याध्यक्ष संतोष मोरे, उदय मोरे, अमित मोरे, निखील मोरे, शरद मोरे, दिगंबर माळी, आप्पासाहेब ढेकळे, अण्णा मोरे, भारत मोरे, प्रदीप मोरे, संजय गोरख आदी उपस्थित आहेत. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR