27.6 C
Latur
Monday, April 22, 2024
Homeमुख्य बातम्यामनोज जरांगे पाटलांची उपोषण मागे घेतल्याची केली घोषणा

मनोज जरांगे पाटलांची उपोषण मागे घेतल्याची केली घोषणा

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यांनी उपचार घेण्याची तयारी दाखवली आहे. उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करा असे ते मराठा बांधवांना म्हणाले. हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार घेऊन आणि त्यानंतर दोन-तीन दिवसानंतर ते पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना त्यांना भेटता येत नाही. यासाठी ते आता स्वत:च लोकांच्या भेटी घेणार आहेत. यासाठी त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. गावातील महिलांच्या हातून रस पेऊन ते उपोषण मागे घेणार असल्याचे कळते. आंदोलनाची पुढची दिशा ते लवकरच जाहीर करणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR