17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : दोन हायवांनी ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेत दुचाकीस्वारांना चिरडले. यात परीक्षेला जाणारे तिघे बहीण-भाऊ जागीच ठार झाले. हा भीषण अपघात बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेलसमोर गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला. मृत तिघेही बहीण-भाऊ परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दरवाडे यांनी दिली.

प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृतांची नावे आहेत. ते वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील होते. त्यांच्याजवळ वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकिट सापडले. यावरून ते परीक्षा देण्यासाठी जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

मागील काही दिवसांपासून ते सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात रहात होते, अशी माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यावर चिकलठाणा पोलिस तात्काळ घटनास्थळी गेले. त्यांनी तिन्ही मृतदेह घाटीत पाठवले आहेत. या घटनेची चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR