जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मालदाभाडी गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश असल्याची माहिती आहे. मिळालेल्या महितीनुसार, आज दुपारी १५ ऑक्टोबर रोजी चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मालदाभाडी परिसरात ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
















