कानपूर : सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास कानपूर देहाटमधील सिकंदरा येथील संदलपूर रोडवरील जगन्नाथपूर गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला, तर २ जण जखमी झाले. कौटुंबिक समारंभाला उपस्थित राहून सर्वजण परतत होते. कारचे नियंत्रण सुटून नाल्यात उलटल्याने हा अपघात झाला.
कानपूर देहात मध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. एका कारचे नियंत्रण सुटून नाल्यात पडल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात बीएसएफ जवानासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर देहातमधील सिकंदराच्या संदलपूर रोडवरील जगन्नाथपूर गावाजवळ सोमवारी पहो स्विफ्ट डिझायर कार अनियंत्रित नाल्यात पलटी झाली. कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला, तर कारमध्ये अडकलेल्या दोन मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. हे सर्वजण औरैया जिल्ह्यातून एका कौटुंबिक समारंभात सहभागी होऊन परतत होते. पोलिसांनी सर्वांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी सहा जणांना मृत घोषित केले.