हापूर : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी हापूरमध्ये भीषण रस्ता अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन वाहनांच्या जोरदार धडकेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली-लखनौ एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला. अपघातानंतर सर्व मृतदेह गडमुक्तेश्वर सीएचसी रुग्णालयात आणण्यात आले. याबाबत रुग्णालयाचे डॉक्टर सुजित कुमार यांनी सांगितले की, सुरुवातीला २ मृतदेह आणण्यात आले होते मात्र आता आणखी ४ मृतदेह आणण्यात आले आहेत.
हे सर्व मृतदेह पोलिसांच्या उपस्थितीत आणण्यात आले आहेत. आम्ही मृतदेह ताब्यात दिले आहेत. या अपघाताबाबत हापूरचे एएसपी राजकुमार अग्रवाल म्हणाले की, या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
हा अपघात इतका भीषण होता की कारमध्ये बसलेल्या सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीची स्थिती पाहून अपघात किती भयानक होता याचा अंदाज लावता येऊ शकतो.