25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; ट्रक जळून खाक, दोन जखमी

समृद्धी महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; ट्रक जळून खाक, दोन जखमी

छ. संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून अपघातांच्या मालिकांमुळे सतत चर्चेत येणा-या समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. ज्यात एका भरधाव ट्रकने रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुस-या ट्रकला मागून जोरदार धडक दिली आहे. ही धडक एवढी जोरदार होती की या धडकेनंतर ट्रकमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीमध्ये एक ट्रक जळून खाक झाला असल्याने यात ट्रक आणि त्यामधील मालाचे मोठे नुकसान झाले आहे.

सुदैवाने या अपघात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकमधील दोन जण जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. हा अपघात सोमवारी पहाटे ५:३० च्या सुमारास समृद्धी महामार्गावरील वाशिमच्या कारंजा जवळ झाला आहे.

समृद्धी महामार्गावर आज ११ मार्चच्या पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास एक ट्रक हा हाट्रोजन मोनॉक्साई घेऊन नागपूरच्या दिशेन जात होता. दरम्यान, या महामार्गावरील लोकेशन क्रमांक १७५ते १८३दरम्यान काही कारणास्थाव हा ट्रक रस्त्यालगत उभा असताना, मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यानंतर या ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रकला आग लागताच त्यातील चालक आणि इतरांनी ट्रकमधून पळ काढला. त्यामुळे या अपघात कुठलीही जीवितहानी झाली नाही. अल्पावधीतच आगीने दोन्ही ट्रकवर ताबा मिळवला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR