24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeधाराशिवधाराशिवनजिक भीषण अपघात; चालकाचा पाय तुटला

धाराशिवनजिक भीषण अपघात; चालकाचा पाय तुटला

धाराशिव : भरधाव मालवाहू ट्रक दुभाजक क्रॉस करून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या (विरूद्ध दिशेच्या) ट्रकवर आदळला. या भीषण अपघातात एका चालकाचा पाय तुटला आहे. तर दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
ही घटना रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील धाराशिव शहरातील तेरणा कॉलेजनजिक घडली.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग धाराशिव शहरातून जातो. नगरपालिकेचे जलशुध्दीकरण केंद्र ते जुना उपळा रोड या दरम्यान महामार्गाला तीव्र स्वरूपाचा उतार आहे. त्यामुळे सोलापूरच्या दिशेने जाणा-या वाहनांना प्रचंड वेग असतो. अशावेळी नियंत्रण सुटून वा टायर फुटल्याने सातत्याने अपघाती घटना घडत आहेत.

अशाच स्वरूपाची घटना रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महामार्गावर धाराशिव शहरातील तेरणा कॉलेजच्या समोर घडली. छत्रपती संभाजीनगरहून सोलापूरकडे निघालेला मालवाहू ट्रक तीव्र उताराला लागताच चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रक प्रचंड वेगात असल्याने महामार्गावरील दुभाजक क्रॉस करून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या दुस-या मालवाहू ट्रकवर तो आदळला.

अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांचे ‘हेड’अक्षरश: चक्काचूर झाले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या ट्रकच्या चालकाचा पाय तुटल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. तर दुस-या ट्रकचा चालकही जखमी आहे. या दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR