22.1 C
Latur
Friday, September 27, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक-जळगाव मार्गावर भीषण अपघात; २ ठार, ४ गंभीर

नाशिक-जळगाव मार्गावर भीषण अपघात; २ ठार, ४ गंभीर

जळगाव : प्रतिनिधी
नाशिक-जळगाव मार्गावर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. दोन कारची समोरासमोर धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी आणि मयत एकाच कुटुंबातले असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची नोंद पोलिसांत झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नांदगावच्या हिरेनगरजवळ नाशिक-जळगाव महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक झाली. भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात इतका भीषण होता की, दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले आणि जखमी हे जळगावच्या पाचोरा आणि नाशिकच्या मोहाडी इथले आहेत. ते जळगावकडून नाशिकला जात असताना हा अपघात झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे शिवाजी भास्कर देशमुख आणि उषा नारायण महाजन अशी आहेत. तर अपघातात आशा शिवाजी देशमुख, विकास शिवाजी देशमुख, गयाबाई आदिक देशमुख, नारायण सुकदेव महाजन हे जखमी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR