20.2 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्र‘समृद्धी’वर जीवघेणा खड्डा! बांधकामाच्­या दर्जावर प्रश्नचिन्ह

‘समृद्धी’वर जीवघेणा खड्डा! बांधकामाच्­या दर्जावर प्रश्नचिन्ह

नागपूर: नागपूर ते मुंबई दरम्यानचे सुमारे ८०० किलोमीटरचे अंतर अवघ्या दहा तासांत कापणा-या ‘समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, एवढ्या कमी कालावधीत रस्ते अपघात आणि अनेकांचे बळी गेल्याने या रस्त्याला आता ‘मृत्यूचा रस्ता’ म्हटले जात आहे.

यातच आता नांदगाव खंडेश्­वर तालुक्­यातील लोहोगावनजीक पुलाला खड्डा पडला आहे. महामार्गाजवळून शेतकरी पायी जात असताना पुलावरील काँक्रिट कोसळले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्याच्या आराखड्यात व बांधकामात त्रुटी असल्याची तक्रार करण्यात येत होती.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग ५५ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. मात्र, उद्घाटनानंतर काही महिन्यांतच महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

महामार्गावरील प्रवासी सुविधांचा अभाव हे देखील समृद्धी महामार्गावर वारंवार होणा-या अपघातांचे कारण मानले जात आहे. सुविधांअभावी वाहनचालकांना सतत लांब पल्ल्याच्या गाड्या चालवाव्या लागत आहेत. सतत वाहन चालवल्यामुळे वाहनचालकांना हायवेच्या संमोहनाचा त्रास होत असून, लेन कटिंग, ओव्हर स्पीडिंगसारख्या चुका होत आहेत. त्यामुळे रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR