22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeमहाराष्ट्रमालेगावात पिता-पुत्रावर तलवारीने हल्ला

मालेगावात पिता-पुत्रावर तलवारीने हल्ला

नाशिक : प्रतिनिधी
मालेगावात गुन्हेगारीच्या घटनांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच एमआयएमच्या माजी महापौरांवर गोळीबार करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता माजी नगरसेवक आणि त्यांच्या मुलावर तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
या घटनेने मालेगाव पुन्हा एकदा हादरले आहे. अजीज लल्लू असे या हल्ला झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे, या हल्ल्यात ते आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, माजी महापौरांवर गोळीबार करून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना ताजी असताना, रात्री एका माजी नगरसेवक आणि त्यांच्या मुलावर तलवारीने कारण्यात आलेल्या हल्ल्यामुळे मालेगाव पुन्हा हादरले आहे. अजीज लल्लू असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे. ते आणि त्यांचा मुलगा नमाज पठण करून घरी जात असताना हजारखोली भागातील मदिना चौक येथे या दोघांवर दोन ते तीन अज्ञात लोकांनी तलवारीने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. जुन्या भांडणाची कुरापत काढून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वारंवार घडत असलेल्या हल्ल्याच्या घटनांमुळे मालेगावात चाललेय तरी काय? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR