मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात महिला सफाई कर्मचारी गंभीर जखमी

पाथरी : पाथरी शहरात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगरपरिषद कार्यक्षेत्रातील प्रभाग ९ मधील कंत्राटी महिला सफाई कामगार भागुबाई कांबळे यांच्यावर दि. ४ नोव्हेंबर रोजी मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला करत चावा घेतला. या घटनेमुळे महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असून उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये घबराहट पसरली असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दि. ४ नोव्हेंबर रोजी नगरपरिषद महिला सफाई कर्मचारी भागुबाई कांबळे नेहमीप्रमाणे प्रभाग ९मध्ये सफाईचे काम करत होत्या. यावेळी मोकाट कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला करत गंभीर जखमी केले. कुत्र्याच्या हल्ल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या दिवाळीचा सणाला सुरुवात झाली असून शाळेला सुटी असल्याने लहान मुले रस्त्यावर व घराबाहेर खेळण्यासाठी पडत आहेत. शहरातील गल्लीबोळांत भटक्या कुत्र्यांची टोळकी फिरत असल्याने लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच धोका निर्माण झाला आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिक प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत. शहराच्या वर्दळीच्या भागातच नगरपरिषद कर्मचारी सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांचे काय? असा संतप्त सवाल आता पाथरीकर विचारत आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत. कुत्रे पकडण्याची मोहीम राबवून नागरिकांना भयमुक्त करावे,अशी मागणी जोर धरत आहे. या घटनेनंतर नगरपरिषद प्रशासन कोणती पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded News | रोहित पवारांवर गुन्हा दाखल करा; भाजपाची पोलिसांकडे मागणी, महापौरांचे निवेदन
02:37
Video thumbnail
Latur News | समान काम समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; न्यायालयीन कामकाज ठप्प
05:22
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07

Latest news