31.9 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeमहाराष्ट्रहिंमत असेल तर लढ माझ्याविरोधात

हिंमत असेल तर लढ माझ्याविरोधात

छगन भुजबळांचे जरांगेंना खुले चॅलेंज २८८ उमेदवार उभे करून दाखव

मुंबई : रोज रोज भूमिका बदलू नका, २८८ उमेदवार उमेदवार तुम्ही उभे करणार आहात असं बोलताय, तुमच्यात ंिहमत असेल २८८ उमेदवार उभे करा हे आमचे आव्हान आहे. प्रत्येक वेळी बदलायचे कारण काय, आज उपोषणाला बसतात आणि दुस-या दिवशी उठतात अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, आता जरांगे मुस्लिमांनीही आरक्षण द्या बोलतायेत परंतु मुस्लीम समाजाला महाराष्ट्रात २५ वर्षापूर्वी आरक्षण दिले. इकडे माळी समाज, तिकडे बागवान, इकडे खाटीक तिकडे कुरेशी, इकडे कासार तिकडे मण्यार असं मुस्लीम समाजाला आरक्षण दिले आहे. पण माहिती नसलेल्या गोष्टी अर्धवट माहिती असणारे लोक बोलतात. मध्येच बोलतात मी शेतक-यांचे प्रश्न सोडवणार, मी हे करणार वैगेरे…तू एकच काम कर २८८ जागा लढव असे त्यांनी म्हटले.

तसेच मनोज जरांगेंनी स्वत: माझ्यासमोर निवडणुकीत उभे राहावे. माझ्यासमोर उभे राहावे ही माझी इच्छा आहे. मला पाडले तरी माझा आवाज बंद होणार नाही. ओबीसींचे आरक्षण आणि त्यांचे संरक्षण करणे हे माझे काम आहे. मग ते सरकारमध्ये काय किंवा रस्त्यावर काय, भुजबळाला या ५७-५८ वर्षात सवयच आहे. रस्त्यावरही लढायची आणि सरकारमध्येही काम करायची त्यामुळे मला चिंता नाही. येवला मतदारसंघात कुणीही लढावे मी त्याच्याविरोधात १ लाख मतांनी निवडून येईल असा विश्वास छगन भुजबळांनी व्यक्त केला.

मी जरांगेला गांभीर्याने घेत नाही
आम्हाला राजकारण नको, राजकारणात जायचं नाही असं बोलणार त्यानंतर पुन्हा पाडायच्या भाषा वापरणार, २८८ उमेदवार उभे करण्याची भाषा करणार. पुन्हा एकेकाला बोलावून माहिती घेणार, काहीतरी सर्व्हेक्षण करणार त्यामुळे मनोज जरांगेंना फारसं गांभीर्याने मी घेत नाही असा टोलाही छगन भुजबळांनी लगावला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR