27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये मारामारी

पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये मारामारी

नाशिक : नाशिक शहरातील जुने नाशिक परिसरात असलेल्या चौक मंडई भागातील वाहनांची एका टोळक्याने तोडफोड केली आहे. हातात लाठ्या काठ्या घेत या अज्ञात टोळक्याने सात ते आठ चारचाकी आणि दोन ते तीन दुचाकींची तोडफोड केली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

दोन गटांतील वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, वाहन तोडफोडीची ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे.

भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुन्या नाशकातील चौक मंडई परिसरात दोन युवकांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान मारामारी व दगडफेकीत झाले. त्यानंतर काही युवकांनी गैरकायद्याच्या मंडळींना सोबत घेत परिसरातील वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत हे टोळके फरार झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR