22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयनिळ्या साडीमध्ये दिसल्या अर्थमंत्री सीतारामन

निळ्या साडीमध्ये दिसल्या अर्थमंत्री सीतारामन

प्रत्येक वेळी बजेट सादर करतानाचा खास लूक

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपला सहावा अर्थसंकल्प सादर केला. दरवर्षी अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी वेगवेगळा लूक केला आहे. २०२४ च्या अर्थसंकल्पाच्या दिवशी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रिंटेड निळ्या रंगाची साडी नेसली आहे. आणि त्यासोबत त्यांनी सोनेरी रंगाची शालही घेतली आहे.

निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवसासाठी निळ्या रंगाची साडी निवडली आहे. अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी बहुतांश लोकांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे असतात, मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साडीनेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
त्यांनी २०१९ मध्ये त्यांचा कार्यकाळ सुरू केला, तेव्हापासून त्या प्रत्येक बजेटमध्ये त्यांच्या खास लूकमुळे चर्चेत राहिल्या.
दरवर्षी बजेटमध्ये त्या हातमागाच्या साड्या नेसताना दिसल्या ज्यावरून त्यांचे साडीवरील प्रेम स्पष्टपणे दिसून येते. मॉडर्न प्रिंटेड साड्या नेसण्याऐवजी अर्थमंत्री या सुंदर हातमागाच्या साड्या नेसतात. अर्थसंकल्पाच्या दिवशी त्या जी साडी नेसतात त्याचे विशेष महत्त्व असते.

अर्थसंकल्प २०१९
२०१९ मध्ये निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी तेव्हा चमकदार गुलाबी रंगाची साडी घातली होती ज्यात सोनेरी रंगाची बॉर्डर होती. ‘मंगलगिरी’ असे या साडीचे नाव आहे.

अर्थसंकल्प २०२०
२०२० च्या केंद्रीय अर्थसंकल्पासाठी निर्मला सीतारामन यांनी पिवळा रंग निवडला होता. या दिवशी त्यांनी मॅचिंग ब्लाऊजसह सिल्कची पिवळी साडी नेसली होती.

अर्थसंकल्प २०२१
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१ च्या अर्थसंकल्पासाठी लाल आणि ऑफ-व्हाईट पोचमपल्ली सिल्क साडीची निवड केली होती. या साडीसोबत त्यांनी साधा लाल रंगाचा ब्लाऊज घातला होता. साडीची खासियत म्हणजे त्याची बॉर्डर ज्याच्या आजूबाजूला इक्कत पॅटर्नची डिझाईन होती.

अर्थसंकल्प २०२२
अर्थसंकल्प २०२२ साठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा लूक खूपच खास होता. या दिवशी हातमागावर विणलेल्या साडीत त्या संसदेत पोहोचल्या. या दिवशी त्यांनी गडद मरून रंगाची साडी परिधान केली होती ज्यावर चांदीच्या धाग्याचे वर्क होते. या साडीचे नाव बोमकाई आहे, ती प्रामुख्याने भारताच्या पूर्वेकडील राज्य ओडिशामध्ये बनविली जाते.

अर्थसंकल्प २०२३
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३ च्या अर्थसंकल्पासाठी लाल रंगाची साडी नेसली होती. या साडीवर पारंपरिक पद्धतीने कसूती वर्क करण्यात आले होते. या साडीवर रथ, मोर आणि कमळाचे काम करण्यात आले होते. निर्मला सीतारामन यांच्या या सिल्क साडीचे वजन ८०० ग्रॅम होते जे धारवाडच्या ‘अराठी क्राफ्ट्स’ने डिझाईन केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR