24.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeसोलापूरबोगस कॉलद्बारे नागरीकांची आर्थीक फसवणूक

बोगस कॉलद्बारे नागरीकांची आर्थीक फसवणूक

सोलापूर : हॅलो… मी मुंबई क्राइम ब्रँचमधून बोलतोय! दिल्लीतून बोलतोय किंवा ईडीच्या कार्यालयातून बोलतोय… अशा प्रकारचे फोन आले तर सावध व्हा. अशा खोट्या कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक होण्याची भीती घातली जाऊ शकते. विविध प्रकारे ब्लॅकमेल करून आरटीजीएस, गुगल पे, फोन पे, आयएमपीएस, बँक खात्यातून रक्कम ट्रान्सफर करून फसवणूक होण्याची शक्यता आहे.
सोलापूर शहरातील लोकांना बनावट मोबाइल क्रमांकावरून तुमचे सिमकार्ड ब्लॉक होणार आहे. तुमच्या बँक खात्यावरून संशयास्पद ट्रान्झेक्शन झालेले आहेत. इन्कमटॅक्स नियमांचे उल्लंघन झालेले आहे. तुम्हाला पोलिस कोणत्याही क्षणी अटक करतील. तुमच्या नावावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

आम्ही क्राइम बॅचमधून बोलतोय. मी ‘एक्सवायझेड’ पोलिस अधिकारी बोलतोय! तुमचे अटक वॉरंट निघाले आहे. तुमच्या बँक खात्याची चौकशी सुरू आहे. तुमच्या खात्यातून मोठ्या रकमेचे व्यवहार झाले आहेत. लोकांना त्यांची नावे, बँकेचे नाव, राहण्याचा पत्ता, घरातील लोकांची
माहिती, सोन्या-चांदी दागिन्यांची माहिती, व्यवसाय व मालमत्तेची माहिती विचारून त्या आधारे लोकांवर भीतीयुक्त माहिती सांगून खोटी कागदपत्रे व्हॉट्सअ‍ॅप व सोशल मीडियावरून पाठवले जातात. पोलिस तुम्हाला अटक होण्यापासून वाचवतील.

तुम्ही कोणालाही काही न सांगण्यासाठी आरटीजीएस, गुगल फोन पे सारखे ऑनलाइन ट्रान्झेक्श करून फसवण्याचे अनेक प्रकार निदर्शनास येत आहेत. अशा प्रकारापासून सावध राहावे, असे आवाहन शहर पोलिस आयुक्तालयातील सायबर क्राइमच्य वतीने करण्यात आले आहे.सध्या सोशल मीडियामधील फेसबुक, टेलिग्राम, व्हॉट्सअप, युट्यूब यावर आर्थिक फसवणुकीच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त परतावा मिळेल म्हणून मोठ्या प्रमाणात शहरातील लोकांची फसवणूक होत आहे.

लोकांना बनावट लिंकद्वारे ग्रुपमध्ये अ‍ॅड करून त्यातून कंपनीचे शेअर दिल्याचे व चांगला परतावा मिळाल्याचे भासवत आहेत. यातून आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही जाहिरातीला बळी पडू नका, असेही सायबर सेलकडून सांगण्यात आले आहे.लोकांना सोशल मीडियावरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल, फोन कॉल करून भीती दाखवली जाते. सोशल मीडियावरून व्हिडीओ कॉल आल्यास त्यांना प्रतिसाद देऊ नये असे प्रकार घडल्यास पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, शक्यतो नागरिकांनी सावध रहाणे हा उत्तम उपाय आहे.असे पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR