सेलू : विद्यार्थ्यामध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरतेचे ज्ञान असावे. भविष्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन करून त्याचा योग्य वापर करावा. शासनाकडून मिळणा-या सुविधा, खाते काढण्यासह युनो अॅपचा वापर करावा. आर्थिक साक्षरता उज्ज्वल भवितव्यासाठी काळाची गरज आहे, असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रमुख रोखपाल अतुल दातार यांनी केले.
येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्पेरस पब्लिक स्कूल येथे माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानांतर्गत आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून सेलू स्टेट बँक ऑफ इंडियाचे रोखपाल प्रमुख अतुल दातार, मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. बँकेत खाते उघडणे, बचत करण्याची पद्धत, कजार्चे व्यवहार, करांमधील बचत, गृहकर्ज, विमा प्रीमियम, गुंतवणुकीतील परतावा, भाग (शेअर्स) खरेदी, लाभांश, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, विद्युतीय आधुनिक उपकरणांचा वापर, पंजीकृत संस्थेतील गुंतवणूक इत्यादींबाबत माहितीचा समावेश आर्थिक साक्षरतेत होतो. आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने शाळेत विद्यार्थ्यांना पैशाचे नियोजन कसे करावे. कशा प्रकारे गुंतवणूक असते, बँकाचे व्यवहार, कर्जाची पद्धत कशी असते या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडीयाचे दातार यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच विद्याथ्यार्नी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी उत्तमरित्या समजावून सांगितली. सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले.