27.5 C
Latur
Wednesday, April 2, 2025
Homeपरभणी२७३ विनातिकीट प्रवाशांकडून २ लाखांचा दंड वसूल

२७३ विनातिकीट प्रवाशांकडून २ लाखांचा दंड वसूल

परभणी : नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने केलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत २७३ विनातिकीट प्रवाशांवर कार्यवाही करण्यात आली. या कारवाईत जवळपास २ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे फुकट्या प्रवाशांचे धाबे दणाणले आहे.

नांदेडच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती निती सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२८ रोजी तिकीट तपासणी मोहीम यशस्वीरित्या पार पडली. यामध्ये नांदेड येथे रेल्वे स्थानकातील अनधिकृत प्रवेश आणि रेल्वे प्रवासाला आळा घालण्याच्या उद्देशाने ही कारवाई वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. जे. विजय कृष्णा यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

या तपासणीत १० तिकीट तपासनीस यांचा सहभाग होता. तसेच वाणिज्य निरीक्षक आणि विभागीय कार्यालयातील कर्मचारी यांनीही सक्रिय सहभाग घेवून तिकीट तपासणीच्या कामात मदत केली. रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) कर्मचा-यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण सहकार्य केले. तपासणी दरम्यान, सर्व अनधिकृत प्रवास करणा-या व्यक्तींना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. या तपासणी मोहिमेत नांदेड रेल्वे स्थानकावर एकूण १४१ अनाधिकृत प्रवाशांवर कारवाई करीत १,२३,०६० एवढा दंड वसूल करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर नांदेड विभागाचे सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक एन. सुब्बाराव यांनी तिकीट तपासणी केली. या व्यापक तपासणीत छत्रपती संभाजीनगर बेसवरील ११ तिकीट तपासनीस यांचा वाणिज्य निरीक्षकांसह सहभाग होता. त्यांनी सक्रियपणे भाग घेतला. तिकीट तपासणीच्या कामात मदत केली. रेल्वे संरक्षण दलाच्या कर्मचा-यांनी ऑपरेशन दरम्यान महत्त्वपूर्ण मदत केली. येथील तिकीट तपासणी मोहिमेतून १३२ अनाधिकृ प्रवाशांवर कारवाई करीत ७५९८५ दंड वसूल करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागाने दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR