27.3 C
Latur
Wednesday, November 13, 2024
Homeक्रीडापहिलाच वनडे टाय

पहिलाच वनडे टाय

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली वनडे मॅच रोमांचक झाली. श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ विकेटवर २३० धावा केल्या होत्या. भारताने या धावसंख्येचा पाठलाग करताना सर्वबाद २३० धावा केल्या. यामुळे मॅच टाय झाली. टी २० मालिकेप्रमाणे सुपरओव्हर नसल्याने पहिली मॅच टाय झाली. भारताला विजयासाठी एका रनची गरज असताना शिवम दुबे आणि अर्शदीप सिंग पाठोपाठ बाद झाले आणि मॅच टाय झाली. रोहित शर्माने आक्रमक सुरुवात करुन दिल्यानंतर इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आणि भारताला विजयापासून रोखण्यात श्रीलंकेला यश आले.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील मॅच टाय होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१२ मध्ये एडिलेडमध्ये मॅच टाय झाली होती. रोहित शर्माने गेल्यावर्षीचा वनडे वर्ल्ड कप आणि यंदाचा टी २० वर्ल्ड कपमध्ये ज्या प्रकारे भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली होती. त्या प्रमाणे आज देखील त्याने आक्रमक फलंदाजी केली. रोहित शर्माने शेवटची वनडे मॅच २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळली होती. जवळपास नऊ महिन्यांनतर रोहित शर्मा वनडे मॅच खेळला. यामध्ये त्याने ४७ बॉलमध्ये ५८ धावा केल्या. रोहित शर्माने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. केएल राहुल, अक्षर पटेल, विराट कोहली आणि शिवम दुबे यांनी चांगली सुरुवात करुन मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने भारतीय संघ विजयापासून एक पाऊल दूर राहिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR