मुंबई : विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकाल वाचन सुरू झाले आहे. सर्वात आधी खरी शिवसेना कोणाची यावर निर्णय देणार असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले. तसेच, त्यानंतर आमदार अपात्रतेवर निर्णय देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचे आभार
निकाल वाचनास सुरूवात करण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे हा निवाडा करण्याची संधी मिळाली, सर्व विधानसभा सहका-यांचे आभार, तसेच, सर्व वकिलांचेही आभार, असे म्हणत विधानसभा अध्यक्षांनी गटावार निकालाचे वाचन सुरू केले.
शिवसेना पक्षाच्या घटना दुरुस्तीची
दोन्ही पक्षकारांना पूर्ण कल्पना होती
शिवसेनेची घटना काय आहे आणि त्यानुसार पक्ष कुणाचा याचा अभ्यास, निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या घटनेच्या संदर्भात दोन्ही गटात मतभेद, २०१८ सालची घटना ही यामध्ये महत्त्वाची मानली गेली आहे. घटनेच्या १० व्या सुचीनुसार शिवसेना कुणाची? अधिकृत व्हीप कुणाचा? बहुमत कुणाचे हे ठरवणे होते, २०१८ मधील घटनेच्या दुरूस्तीची दोन्ही पक्षकारांना पूर्ण कल्पना होती, असे निकाल वाचताना विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.