26.1 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातली पाच शहरे नक्षल्यांच्या टार्गेटवर

राज्यातली पाच शहरे नक्षल्यांच्या टार्गेटवर

हिंसा घडवण्याचा कट; पोलिस महानिरीक्षकांची माहिती

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातील पाच शहरांमध्ये हिंसक घटना घडवण्याचा नक्षलवाद्यांचा कट आहे अशी माहिती आता समोर आली आहे. सरकारविरोधात असंतोष निर्माण केला जाण्यासाठी हे केले जाणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि गोंदिया या पाच शहरांमध्ये नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्याचा कट रचला आहे. नागपूरचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

सीपीआय माओवादी जे आहेत त्यांचाच एक भाग आहे युनायटेड फ्रंट. युनायटेड फ्रंट हे शेतकरी, विद्यार्थी यांच्यामार्फत शासनाविरोधात रोष निर्माण करणं हे या युनायटेड फ्रंटचे काम आहे. ज्यांना आपण शहरी माओवादी म्हणतो. त्यांची गोपनीय माहिती मिळाली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, गोंदिया, नागपूर या शहरांमध्ये त्यांनी त्यांचं नेटवर्क तयार केले आहे. या ठिकाणी शहरी नक्षलवाद पेरणे सुरु आहे. शहरी नक्षलवाद्यांना पाठिंबा देणा-या ५४ संस्था आमच्या रडारवर आहेत.’ ही माहिती नक्षलवाद विरोधी मोहिमेचे प्रमुख संदीप पाटील यांनी दिली.

सीपीआय माओइस्ट या बंदी घातलेल्या संघटनेची युनायटेड फ्रंट ही शाखा राज्यातल्या पाच शहरांमध्ये आंदोलने आणि घातपात घडवणार असल्याचे समजते आहे. पुण्यातील झोपडपट्टीतील काही मुले नक्षली चळवळीसाठी जंगलात पाठवली जात आहेत. पुण्यात एटीएसच्या ताब्यात असलेला संतोष सेलार याला नक्षलवाद्यांनी जंगलात पाठवले होते. तसेच शहरी नक्षलवादी तरुणांची भरती करुन जंगलात पाठवत आहेत. अशीही माहिती पाटील यांनी दिली.

कोणत्या पाच शहरांवर नक्षल्यांचे लक्ष?
नक्षलवाद्यांनी महाराष्ट्रातल्या पाच प्रमुख शहरांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, गोंदिया ही शहरं नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरी नक्षल चळवळीवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे. महाराष्ट्राच्या नक्षल विरोधी अभियानाचे आयजी संदीप पाटील यांनी माहिती दिली . समाजात सरकारविरोधी असंतोष निर्माण करण्याचा आणि हिंसक आंदोलनाचा शहरी नक्षलवाद्यांचा प्रयत्न आहे. यामुळे शहरी नक्षलवाद्यांना समर्थक करणा-या ५४ संघटना पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत असंही त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR