35.2 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeराष्ट्रीयलंडनहून मुंबईला येणारे विमान तुर्कीला पोहोचले

लंडनहून मुंबईला येणारे विमान तुर्कीला पोहोचले

२०० हून अधिक भारतीय १५ तास अडकले

नवी दिल्ली : लंडनहून मुंबईला जाणारे व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्सचे विमान वैद्यकीय कारणामुळे तुर्कीकडे वळवण्यात आले. विमान कंपनीने आज या संदर्भात माहिती दिली. वैद्यकीय हस्तक्षेप आणि तांत्रिक तपासणीमुळे विमानाचा मार्ग बदलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

विमानात एकाच वेळी वैद्यकीय आणीबाणी आणि तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे १५ तासांपासून प्रवासी तुर्कीमध्ये अडकले आहेत. व्हर्जिन अटलांटिक फ्लाइट व्हीएस३५८ ने २ एप्रिल रोजी लंडनहून मुंबईला उड्डाण केले होते. पण अचानक ते तुर्कीतील दियारबाकीर विमानतळावर वळवण्यात आले. विमान कंपनीने दिलेली माहिती अशी, विमानाची तांत्रिक चौकशी देखील केली जाईल.

या संदर्भात, एका एक्स वापरकर्त्याने भारतीय दूतावासाकडे हस्तक्षेपाची विनंती केली. त्यांनी लिहिले की लंडनहून उड्डाण घेतल्यानंतर मुंबईला जाणा-या व्हर्जिन अटलांटिक विमानाला दियारबाकिर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. एका गर्भवती महिलेसह २०० हून अधिक भारतीय प्रवासी पाणी आणि मूलभूत सुविधांशिवाय अडकले आहेत.

दूतावासाचे अधिकारी संपर्कात
या ट्विटला उत्तर देताना दूतावासाने लिहिले की, अंकारा येथील भारतीय दूतावास दियारबाकीर विमानतळ संचालनालय आणि संबंधित अधिका-यांशी सतत संपर्कात आहेत. अडकलेल्या प्रवाशांची काळजी घेण्यासाठी शक्य तितके समन्वय आणि प्रयत्न केले जात आहेत. एका वापरकर्त्याने दावा केला की, त्यांचा एक नातेवाईक अडकलेल्या प्रवाशांमध्ये आहे आणि त्याचे कुटुंब त्याच्याबद्दल चिंतेत आहे. प्रवाशांना फक्त एकच सँडविच खायला देण्यात आले असल्याचेही त्याने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR