27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeपरभणीभारतीय संस्कृतीमध्ये लोककलेला अनन्यसाधारण महत्व

भारतीय संस्कृतीमध्ये लोककलेला अनन्यसाधारण महत्व

परभणी : भारतीय संस्कृतीमध्ये लोककलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी या लोककलेचा चिकित्सकवृतीने अभ्यास करून भारतीय संस्कृतीच वैभव सांगणा-या लोककलेची जोपासना करावी असे प्रतिपादन अस्ट्रॉनोमीकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक यांनी केले.

बालरंगभूमी परिषद परभणी अंतर्गत जिल्हा शाखा परभणीच्या वतीने आयोजित लोककला प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरंगभूमी परिषद परभणीचे अध्यक्ष आबा ढोले, प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष प्रा. नितीन लोहट, डॉ अर्चना चिक्षे, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत कुलकर्णी, गोंधळमहर्षी गुलाबराव कदम, शिवाजी सूक्ते, रुक्मिणीबाई कदम गोंधळी, वाडेकर वासुदेव सचिन सरदेशपांडे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी वासुदेव, गोंधळी, वाघ्या मुरळी, गारुडी, लावणी, गवळण, भारुड, शाहीर आदी कलाप्रकार तर ढोलकी, संबळ, हलगी, डफ, मृदंग, लोकवाद्यांची माहिती देऊन सादरीकरण करण्यात आले. यावेळी परिषदेचे प्रमोद बल्लाळ, प्रकाश बारबिंड, सचिन आढे, अभिजित सराफ, रवी पुराणिक, राजू वाघ, दिनकर देशपांडे, प्रमोद जहागीरदार, श्रीकांत कुलकर्णी, केशव लगड, सायली शिंदे, चेतना गोरशेटे, श्रीकांत मानोलीकर, वैजनाथ उमरीकर, संतोष कुलकर्णी, रेवती पांडे, अनंत जोशी आदींनी परिश्रम घेतले. सूत्र संचालन त्र्यंबक वडसकर यांनी तर प्रकाश बारबिंड यांनी आभार मानले.

लोककला प्रशिक्षण कार्यक्रमात समारोप प्रसंगी जेष्ठ विधिज्ञ अशोक सोनी यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना बालरंगभूमीच्या वतीने प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. लोककला म्हणजे काय आणि त्याबद्दल अगदी सुटसुटीत मार्गदर्शन डॉ. अर्चना चिक्षे, रामदास कदम गोंधळी, सुभाष पांचाळ, बालाजी वाडेकर वासुदेव, दत्ता वाडेकर, विजया कातकडे, शाहीर विश्वनाथ झोडपे आणि ग्रुप, अश्विनी नांदे आणि ग्रुप, नमिता पवार आणि ग्रुप, राजाभाऊ चव्हाण, श्रीया लव्हेकर, सई चिटणीस व इतर लोककलावंत यांनी केले. ६ तास चाललेल्या सोहळ्यात विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR