22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रभीमाशंकर पर्यटनासाठी दोन महिने बंद राहणार

भीमाशंकर पर्यटनासाठी दोन महिने बंद राहणार

पुणे : वन्यजीव अभयारण्य पावसामुळे निसरडया झालेल्या वाटांवर होणा-या अपघाताचा धोका लक्षात घेऊन वन्यजीव विभागामार्फत सदर निसर्गवाटा ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आल्याची माहिती भीमाशंकर अभयारण्य क्र. १ चे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील एकमेव असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवल्ािंगाचे दर्शन व सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये असलेले धबधबे, पाऊस, धुके यांचा वर्षा ऋतुुमध्ये देवदर्शन व पर्यटन असा दोन्ही आनंद घेण्यासाठी भाविक, पर्यटक मोठ्या प्रमाणात भीमाशंकरला येत असतात.

मात्र यावर्षी वनपरिक्षेत्र भीमाशंकर अभयारण्य-१ व वनपरिक्षेत्र अभयारण्य-२ भीमाशंकरमधील धबधब्यातील कुंडामध्ये पाण्याच्या प्रवाहाचा व खोलीचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेवून वनपरिक्षेत्र अधिकारी भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य-१ व २ यांच्या वतीने या धबधब्यांकडे जाणा-या सर्व पायवाटांचे प्रवेश प्रतिबंधित करण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR