37 C
Latur
Friday, May 24, 2024
Homeसोलापूरजबरदस्तीने अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो काढून व्हायरल केले

जबरदस्तीने अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो काढून व्हायरल केले

सोलापूर : ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे म्हणून फिरायला नेले अन् १७ वर्षीय मुलीचे अश्लील फोटो काढून ते तिच्या मित्राच्या व्हॉटस्अ‍ॅपवर शेअर करून बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका परिसरात ही घटना घडली.

मजनूने हा प्रकार २०२१- २२ ते २९ मार्च २०२४ या कालावधीत चालवल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. व्यंकटेश वन्नल (सोलापर), असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे. यातील पीडित मुलीचे वय १७ वर्षे४ महिने असून तिने फिर्यादीत म्हटले आहे की, वरील कालावधीत नमूद आरोपीने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे सांगून बाहेर फिरायला नेले. तेथे इच्छा नसताना पीडितेचे अर्धवट कपडे काढून अश्लील फोटो काढले.

त्यानंतर वारंवार व्हिडीओ कॉल करून ‘माझ्याकडे तुझे अश्लील फोटो आहेत ते मी व्हायरल करेन’, अशी धमकी दिली. व्हिडीओ कॉल चालू असताना, पुन्हा पीडितेला तिचे अश्लील फोटो स्वतः काढायला लावून २९ मार्च २०२४ च्या रात्री पीडितेच्या इन्टाग्रॉम अकाऊंटवरून आरोपीला पाठवायला भाग पाडले.

संबंधित फोटो नमूद आरोपीने पीडितेच्या मित्राला व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवून त्याखाली असभ्य मजकूर लिहून पीडितेला मनस्ताप देण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकाराबद्दल पीडितेने नातलगांशी विचारनिनियमय करून एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. दरम्यान वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाघमारे, पोलिस निरीक्षक, महिला सहा. पोलिस निरीक्षक कडू यांनी पीडितेची भेट घेऊन तिची तक्रार जाणून घेतली. पुढील तपास पोलिस निरीक्षक खोमणे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR