34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeधाराशिवआपसिंगा येथे शेतीमालाची चोरी करणारी तीन बालके ताब्यात

आपसिंगा येथे शेतीमालाची चोरी करणारी तीन बालके ताब्यात

धाराशिव : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथे दि. ६ एप्रिल रोजी सकाळी अनेक ठिकाणी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने या चोरीचा छडा लावला असून चोरी करणा-या तीन अल्पवयीन बालकांना पथकाने ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या बालकांना व चोरीस गेलेला शेतीमाल पथकाने तुळजापूर पोलीसांच्या ताब्यात दिला आहे.

धारशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्‌ह्यातील आरोपीची माहिती काढुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकामध्ये सपोनि अमोल मोरे, सपोनि सचिन खटके, पोहेकॉ विनोद जानरव, पोहेकॉ निंबाळकर, पोहेकॉ वाघमारे, पोहेकॉ सय्यद, पोना जाधवर, पोकॉ अरसेवाड यांचा समावेश आहे. हे पथक मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असताना दि. ६ रोजी पथकास गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली होती.

काही व्यक्ती आपसिंगा ता. तुळजापूर येथे चोरीचे साहित्य घेवून विक्रीसाठी थांबले आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी विधीसंघर्ष तीन बालकास ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली. त्यांनी प्रथमत: पोलीसंना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगीतले की, आम्ही तिघांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली.

विशेष पथकाने त्यांच्या ताब्यात असलेले २१० किलो वजनाचे दोन पोते सोयाबीन, बळीराम नांगर, १३० किलो ज्वारी असा एकूण १९ हजार ८५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याची खात्री केली असता तो शेतीमाल आपसिंगा येथून चोरी गेलेला असल्याचे स्पष्ट झाले. पथकातील पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून माल हस्तगत करुन विधीसंघर्ष तीन बालकास चोरीच्या मालासह तुळजापूर पोलीसांच्या ताब्यात दिले.

ही कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ- विनोद जानराव, समाधान वाघमारे, अमोल निंबाळकर, हुसेन सय्यद, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर, पोलीस अमंलदार रविंद्र आरसेवाड यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR