सोलापूर : बनावट सोने खरे असल्याचे भासवून महिलेची ५० हजार रुपयांची फसवणूक करणा-या चार परप्रांतीय आरोपींना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली अण्णा राम बाबूजी सोलंकी वय २३ करण शेलाराम परमार वय १९ दर्गाराम प्रागाराम व ३९ लाखाराम सुनाजी दाबी वय ५५ सर्व राहणार जिल्हा जालोर राजस्थान अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.
वरील चौघांनी एका महिलेस त्यांच्याकडील नकली सोन्यासारखा दिसणारा एक किलो ७०० ग्रॅम वजनाचा हार खरा असल्याचे सांगून महिलेकडील ५० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत एम आयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करून वरील चौघांना अटक केली त्यांच्याकडून गुन्हात वापरलेला म ोबाईल एक दुचाकी सोन्यासारखा दिसणारा हार असा एक लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चौघांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तसेच शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जगन्नाथ मल्लिनाथ कोळी राहणार होडगी, हनुमंत राजू चौगुले राहणार मंडी वस्ती शितल किसन सिंग शिवसिंग वाले राहणार मोदी गल्ली विवेक गोविंद राज बीट राहणार एमआयडीसी प्रसाद नारायण देवगन राहणार मंगळवार पेठ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून फौजदार चावडी जेलरोड एमआयडीसी पोलिस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आणले या पाच आरोपींकडून पोलिसांनी चार गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून दोन लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे
ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉक्टर दिपाली काळे सहाय्यक आयुक्त राजन माने पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पाटील पोलीस अंमलदार राहुल तोगे आबाजी सावळे अजिंक्य माने धीरज सातपुते विठ्ठल वलमार सतीश काटे काळे मच्छिंद्र राठोड प्रकाश गायकवाड यांनी केली.