29.9 C
Latur
Monday, April 7, 2025
Homeउद्योगविदेशी गुंतवणूकदारांचा भारतातून काढता पाय!

विदेशी गुंतवणूकदारांचा भारतातून काढता पाय!

ट्रम्प टॅरिफची भीती, गुंतवणूकदारांनी ४ दिवसांत तब्बल १० हजार कोटी रुपये काढून घेतले

मुंबई : प्रतिनिधी
भारतीय शेअर बाजारातून ऑक्टोबर २०२४ पासून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्याची प्रक्रिया एप्रिल २०२५ च्या पहिल्या ४ दिवसांतदेखील सुरू आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रम्प टॅरिफमुळे सतर्क होत पैसे काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

एप्रिल महिन्यातील पहिल्या ४ दिवसांत विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय शेअर बाजारातून १०३५५ कोटी रुपये काढून घेतले आहेत. डिपॉजिटरीच्या आकडेवारीनुसार २१ मार्च ते २८ मार्च या कालावधीत ६ दिवसांत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात ३०९२७ कोटी रुपये गुंतवले होते. त्यामुळे त्यांनी भारतीय बाजारातून पैसे काढण्याची आकडेवारी मार्च महिन्यात ३९७३ कोटी रुपयांनी घटली.

फेब्रुवारी महिन्यात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय शेअर बाजारातून ३४५७४ कोटी रुपये काढून घेतले होते. जानेवारीत मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेण्यात आले होते. एफपीआयकडून ७८०२७ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री करण्यात आली होती. पीटीआयनुसार बीडीओ इंडियाचे पार्टनर आणि लीडर, एफएस टॅक्स अँड रेग्युलेटरी सर्व्हिसेसचे मनोज पुरोहित यांच्या मते येणा-या काही दिवसांमध्ये मार्केट भागीदारांचे लक्ष अमेरिकेच्या टॅरिफच्या लाँग टर्म परिणाम आणि आरबीआयच्या येत्या आठवड्यातील पतधोरण समितीच्या बैठकीकडे राहील. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात येईल, अशी आशा आहे.

आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी १ एप्रिल ते ४ एप्रिलपर्यंत भारतीय शेअर बाजारातून १०३५५ कोटी रुपये काढून घेतले. २०२५ मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून १.२७ लाख कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे. डेट मार्केटच्या संदर्भातील आकडेवारीनुसार एफपीआयने एप्रिलमध्ये बाँड आणि डेट मार्केट ते जनरल लिमिटपर्यंत ५५६ कोटी रुपयांपर्यंत आणि वॉलेंटरी रिटेन्शन रुटपर्यंत ४०३८ कोटी रुपये काढून घेतले आहेत.

अमेरिकेत महागाई वाढणार
जिओजीत इन्व्हेस्टमेंटसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट वी. के. विजयकुमार, अमेरिकेने लादलेले टॅरिफ अपेक्षेपेक्षा अधिक आहेत, आता त्याच्या व्यापक आर्थिक प्रभावामुळे चिंता निर्माण झाली. भारत आणि इतर देशांवर लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेत महागाई वाढणार आहे. यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात विक्रीचे सत्र पाहायला मिळाली. एस अँड पी ५०० आणि नॅस्डॅक १० टक्के घसरण झाली.

ट्रेड वॉरचा परिणाम दूरगामी
ट्रेड वॉरचा परिणाम दूरगामी होऊ शकतो. ज्यामुळे जागतिक व्यापार आणि आर्थिक वाढीवर परिणाम होईल. डॉलर इंडेक्स १०२ वर येणे भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांसाठी भांडवली प्रवाहासंदर्भात अनुकूल राहू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR