22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना पुन्हा एकदा हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल (बुधवार) दुपारी मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मनोहर जोशी यांना बुधवारी दुपारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर आहे असे समजते आहे. हिंदुजा रुग्णालयाकडून लवकरच त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात येणार आहे.

मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक आहेत. त्यांना जोशी सर असेही संबोधले जाते. मनोहर जोशी यांचे वय ८६ वर्षे आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येत त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली . १९७६ ते १९७७ या काळात ते मुंबईचे महापौरही झाले. तर शिवसेना भाजपाच्या युतीचे सरकार जेव्हा १९९५ मध्ये आले तेव्हा मनोहर जोशी हे मुख्यमंत्रीही झाले.

गेल्या काही काळापासून राजकारणात मनोहर जोशी फारसे सक्रिय नव्हते. मनोहर जोशींनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्यपदही भूषविले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR