नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू माईक प्रॉक्टर यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. आयसीसीच्या सुत्रांच्या मते, माइक प्रॉक्टरची पत्नी मरिना यांनी शनिवारी रात्री उशिरा दक्षिण आफ्रिकेच्या माध्यमांना ही माहिती दिली. प्रॉक्टरने १९७० मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सात कसोटी सामने खेळले होते. त्यापैकी सहा कसोटी सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकले होते.
माईकचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपण्यापूर्वी त्याने १५.०२ च्या सरासरीने ४१ बळी घेतले होते. पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या अंतिम सामन्याच्या दुस-या डावात ७३ धावांत ६ बाद ६ अशी त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे ३२३ आफ्रिकेला ३२३ धावांनी विजय मिळवला मिळाला होता. १९७० मध्ये त्यांना सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून घोषित करण्यात आले होते.
माईक प्रॉक्टर यांनी दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले होते. त्यांनी आपल्या संघाला १९९२ क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले होते. यानंतर त्यांनी २००२ ते २००८ दरम्यान आयसीसी मॅच रेफरी म्हणून काम केले, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू अँर्ड्यू सायमंड्सवर वर्णद्वेषी भाष्य केल्याबद्दल प्रॉक्टरने २००८ मध्ये भारताच्या हरभजन सिंगवर तीन कसोटी सामन्यांची बंदी घातली होती.