नवी दिल्ली : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. सुशील मोदी हे बिहारमधील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते.
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी एक्सवर पोस्ट करून सुशील कुमार मोदी यांच्या निधनाची माहिती दिली आणि दु:खही व्यक्त केले. सम्राट चौधरी यांनी म्हटले की, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांना त्यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली. बिहार भाजपाचे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.