मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज (२५ जानेवारी २०२५) पहाटे निधन झाले. त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वर्धा येथे झालेल्या ९६ व्या आखिल भारतीय सहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
त्यांचे पार्थिव दुपारी 3 च्या सुमारास त्यांच्या जयनगर येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता अंत्ययायात्रा निघून साडेचार वाजता अंतिम संस्कार प्रतापनगर येथे केले जातील.