नांदेड :प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांनी आज बुधवार दि. 3 एप्रिल रोजी सायंकाळी लोहा
शहरातील माने नगर येथील लोहा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या
निवासस्थानी भेट देऊन लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत
त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.
यावेळी लोहा येथील शिवसेना नेते मुक्तेश्वर धोंडगे, कंधार तालुका
काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी पंडागळे, एकनाथ पवार, शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संजय ढाले, राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पवार पक्षाचे लोहा तालुका अध्यक्ष अंगद केंद्रे, शेतकरी कामगार
पक्षाचे लोहा तालुकाध्यक्ष बालाजी इसादकर, ट्वेंटीवन शुगरची व्हॉइस
चेअरमन विजय देशमुख,
माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, रंगनाथ
भुजबळ, बबन निर्मले, राजेसाहेब सवइ, शाहू नळगे आदीसह काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते