20 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeहिंगोलीमाजी मंत्री रजनीताई सातव यांचे निधन

माजी मंत्री रजनीताई सातव यांचे निधन

हिंगोली : माजी मंत्री रजनी सातव यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नांदेड येथील खासगी रुग्णायलात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी दि. १८ फेब्रुवारी रोजी प्रकृती अस्वस्थ असल्याने नांदेड येथील रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रजनी सातव या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आई आणि विधानपरिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्या त्या सासू आहेत. रजनी सातव यांनी राज्याचे आरोग्य आणि समाजकल्याण राज्यमंत्रिपद भूषविले होते. त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील होत्या.

राज्यमंत्री राहिलेल्या रजनी सातव यांनी एकदा विधानसभेत तर एकदा विधानपरिषदेतून नेतृत्व केलं होतं. काँग्रेसच्या प्रदेश संघटनेतही त्या अनेक वर्ष सक्रिय होत्या. सातव कुटुंबिय गेल्या ४३ वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय आहे. सध्या त्यांची सून आमदार आहे. गांधी घरण्याचे निकटवर्तीय, अशी सातव कुटुंबियांची ओळख आहे.

त्यांच्यावर सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता त्याचे राहते घर विकास नगर कळमनुरी ता. कळमनूरी जि. हिंगोली येथे अंत्यसंस्कार विधी करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR