27.1 C
Latur
Thursday, May 29, 2025
Homeलातूरबेलकुंडनजीक भीषण अपघातात माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू

बेलकुंडनजीक भीषण अपघातात माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू

लातूर : लातूर-औसा रोडवर बेलकुंड गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी पाच वाजेच्या दरम्यान झाल्याची माहिती आहे.

प्राथमिक माहिती नुसार, माजी आमदार देशमुख हे औसाकडे चारचाकी गाडीतून येत होते. बेलकुंडजवळ उड्डाणपुलाच्या जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी उलटली. या भीषण अपघातात देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा चेंदामेंदा झाला आहे.

आर. टी. देशमुख हे माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने एक अनुभवी व प्रगल्भ नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR