मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मिणचेकर यांच्या पक्षांतराच्या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
डॉ. सुजित मिणचेकर हे २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून निवडून आले होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमुळे त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली नव्हती. मिणचेकर यांनी आज ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी मनसेचे हातकणंगलेचे जिल्हाप्रमुख गजानन जाधव यांनीही शिंदे गटात प्रवेश केला.