24.2 C
Latur
Friday, February 7, 2025
Homeराष्ट्रीयमाजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील रुग्णालयात दाखल

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बरी नव्हती.

काल त्यांना अधिकच अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने कुटुंबीयांनी पुण्यातील रुग्णालयात दाखल केले. त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. त्यांचे वय ८९ वर्षे आहे. त्यांनी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून २००७ ते २०१२ पर्यंत कार्यभार भूषविला. त्यांना पुण्यातील रुग्णालयात अस्वस्थता जाणवल्यामुळे दाखल केले असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.

त्यांची निवड जळगाव विधानसभा मतदारसंघातून झाली होती. त्यांनी २० वर्षे वेगवेगळ्या खात्यांची मंत्रिपदे सांभाळली आहेत. त्यांनी राज्यसभेच्या उपाध्यक्षा म्हणून जबाबदारी हाताळली. १९९१ साली त्या अमरावतीतून लोकसभेच्या सदस्य झाल्या. त्या सध्या पुण्यात स्थायिक झाल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR