29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रदहावीचे परीक्षा केंद्र बदलल्याने गोंधळ

दहावीचे परीक्षा केंद्र बदलल्याने गोंधळ

कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील एका परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेची अचानक परीक्षा केंद्रावरील बैठक व्यवस्था बदलल्याची माहिती काही विद्यार्थी आणि पालकांना मिळाल्याने मोठी तारांबळ उडाली.त्यावेळी काही पालकांनी संबंधितांना धारेवर धरल्याने काही वेळ गोंधळ उडाला. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता हा प्रकार घडला.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा सुरू आहे. बुधवारी मराठी आणि इंग्रजी माध्यमांचा गणित-१ या विषयाचा पेपर होता. सकाळी साडेदहा वाजता विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात सोडण्यात आले. त्यावेळी ९ मार्च रोजी केंद्र संचालकांनी बैठक व्यवस्थेचे वेळापत्रक फलकावर लावले होते.

त्याचे फोटोही पालकांनी काढले होते. ९ मार्चच्या बैठक व्यवस्थेनुसार खोली क्रमांक आणि परीक्षा केंद्राची खात्री पालकांनी केली होती. मात्र बुधवारी सकाळी ही बैठक व्यवस्था आणि काही विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलल्याचे पालकांच्या लक्षात आले. पालकांनी संबंधितांना जाब विचारला.

त्यावेळी संबंधितांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी पालकांनी सुधारित बैठक व्यवस्था का पाहिली नाही, असे त्यांना सांगितले. त्यावेळी काही वेळ गोंधळ उडाला. अखेर पेपर चुकू नये, म्हणून बदल झालेल्या परीक्षा केंद्रावर काही पालकांनी धाव घेऊन विद्यार्थ्यांना सोडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR