24.5 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeक्रीडाटीम इंडियाचे चार खेळाडू थेट विधानभवनात

टीम इंडियाचे चार खेळाडू थेट विधानभवनात

रोहित शर्मासह सुर्याचा समावेश मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

मुंबई : टी-२० विश्वचषक २०२४4 ची स्पर्धा जिंकून टीम इंडिया आज मायदेशी परतली आहे. सकाळी ६ वाजता टीम इंडियाचे विशेष विमान दिल्लीत दाखल झाले. २९ जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारताने तब्बल १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघ गुरूवारी भारतात परतला आहे. यावेळी टीम इंडियाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे.

सध्या टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी दाखल झाले आहेत. यावेळी टीम इंडियाचे खेळाडू नरेंद्र मोदींसोबत ब्रेकफास्ट करणार आहेत. यानंतर टीम इंडिया मुंबईसाठी रवाना होणार आहे. दुपारी २ ते ३ च्या सुमारास टीम इंडिया मुंबईत दाखल होईल. मुंबईत टीम इंडियाची विजयी यात्रा काढण्यात येणार आहे. टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवरही जाईल. याठिकाणी भारतीय संघाच्या स्वागतासाठी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

सध्या मुंबईत महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान भारतीय संघांचे मुंबईतील खेळाडू रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. यावेळी विधीमंडळाच्या सभागृहात या खेळाडूंचा खास सत्कार करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज माहिती दिली. यासंबंधीचे निमंत्रण या खेळाडूंना देण्यात आले आहे. यावेळी सर्व पक्षाचे आमदार उपस्थित रहावे यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे विनंती करणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आपल्या विश्वविजेत्या खेळाडूंचे भारतात स्वागत आहे. मुंबईत त्यांचे स्वागत आहे. मुंबईकर खूप उत्साहित आहेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवचा गणपती डान्स
टीम इंडिया विमानतळावरून हॉटेलमध्ये पोहोचली आहे. टीम हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वीच अनेक चाहते तिथे उपस्थित होते. हॉटेलच्या गेटवर चाहत्यांनी रोहित शर्मासह सर्व खेळाडूंचा स्वागत केले. यावेळी बस हॉटेल बाहेर पोहताच सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल यांनी डान्स केला. यावेळी सूर्यकुमार मुंबईकर असल्याने त्याने मुंबई स्टाईल गणपती डान्स केल्याची प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR