करमाळा/ (प्रतिनिधी)
समाजकारणातुन राजकारण करणाऱ्या शिवसेना पक्षाच्यावतीने गोरगरीब सर्वसामान्य जनतेला तात्काळ आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख महेश चिवटे वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश दादा चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यासाठी शिवसेना मोफत ॲब्लुलन्स सेवा सुरु करण्यात आली आहे याचा लाभ घ्यावा असे मत शिवसेना विधानसभा अध्यक्ष राहुल कानगुडे यांनी व्यक्त केले.
याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की करमाळा तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे काम चांगले चालु असुन जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखालील करमाळा तालुक्यात शिवसेना भक्कमपणे उभी राहिली आहे.गोरगोरीब सर्वसामान्य जनतेला तात्काळ आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी करमाळा तालुक्यात मोफत ॲब्लुलन्स सेवा सुरु करण्यात आली असून यामध्ये फक्त इंधन व ड्रायव्हर भत्ता पेशंटकडुन घेण्यात येणार आहे तरी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन राहुल कानगुडे यांनी केले आहे.