22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeराष्ट्रीयज्या घरांवर सोलर, त्यांनाच विज मोफत

ज्या घरांवर सोलर, त्यांनाच विज मोफत

रूफटॉपधारंकानाच मिळणार ३०० युनिट विज मोफत सूर्योदय योजनेंतर्गत एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर पॅनेल

नवी दिल्ली : प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना मिळणार आहे. यामुळे लोकांना वीज बिलात मोठा दिलासा मिळणार आहे. आता सर्वसामान्यांना ३०० युनिट वीज मोफत मिळणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अंतरीम अर्थसंकल्प मांडला. यामध्ये विविध योजनांची घोषणा त्यांनी केली आहे.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा अर्थसंकल्प २०२४ मध्ये उल्लेख करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत ज्यांच्या घरात सौर यंत्रणा बसवली आहे. त्यांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर या योजनेची घोषणा केली होती. तसेच अधिका-यांची बैठकही घेतली होती. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेंतर्गत देशभरातील एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्यात येणार आहेत.

पॅनल बसविणा-यांना होणार फायदा
देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, या योजनेमुळे भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या शुभमुहूर्तावर, भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वत:ची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी हा माझा संकल्प आणखी दृढ झाल्याचे पंतप्रधान म्हणाले होते. आमचे सरकार १ कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवण्याचे उद्दिष्ट घेऊन प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होणार नाही, तर भारताला स्वयंभू बनवेल असे पंतप्रधान म्हणाले.

प्रत्येकाला कायमस्वरूपी घरे दिली जातील. स्किल इंडियामध्ये १.४७ कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा विस्तार केला जाईल. मत्स्य उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे. पीएम मोदींनी जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधानचा नारा दिला आहे. हे लक्षात घेऊन पावले उचलली जातील. गेल्या ४ वर्षात आर्थिक विकासाला वेग आला आहे. युवाशक्ती तंत्रज्ञानयुक्त योजना बनवेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR