देगलूर : प्रतिनिधी
तालुक्यात खरिपात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले त्यामुळे सोयाबीन कपाशीच्या उत्पादनात घट झाली आता तूर पिकावर शेतक-्यांना अशा लागली होती मात्र या पिकावर बुरशीजन्य किडीचा प्रादुर्भाव वाढला असल्याने तुरीचे पीक वाळून जात असल्याने शेतकरी हातबल झाले आहे.
खरीपातील सर्वात शेवटी येणारे जास्त कालावधी लागणारे तुरीचे पीक भरलेले असताना त्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला यामध्ये उभ्या असलेल्या हिरव्यागार भरलेल्या तूर सुकलेल्या दिसत आहे खरीप हंगामात तूर हे आंतरपीक म्हणून घेतले जात असले तरी उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पीक आहे शिवाय हंगामातील सर्वात शेवटचे पीक आहे.
आता कापूस अंतिम टप्प्यात असला तरी मात्र तूर हे सिंह भरण्याच्या अवस्थेत आहे मात्र पिकावर किडीचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव हा वाढत आहे त्यामुळे तुरीचे पीक हे संपूर्ण वाळून जात असून आता त्यापासून उत्पादन मिळणार नसल्याने आतापर्यंत पीक जोपासण्याची साठी झालेला खर्चही शेतक-्यांना हाती पडणार नाही दोन दिवसापासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे जोमात असलेल्या तुर पिकाला या वातावरणाचा फटका बसत असल्याचे दिसत आहे सध्या तुरीवर कवळ्या शेंगा ओळखणा-्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे या रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी विविध कीटकनाशकाची फवारणी करताना दिसून येत आहेत आधीच आर्थिक परिस्थिती झालेली असताना अतुल पिकांची किडीपासून संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत असल्याने शेतकरी हातबल झाला आहे.