32.8 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeमुख्य बातम्यागोडसेच्या गोळीने गांधींची हत्या झाली नाही, रणजीत सावरकरांचा दावा

गोडसेच्या गोळीने गांधींची हत्या झाली नाही, रणजीत सावरकरांचा दावा

मुंबई : नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळीने महात्मा गांधीजींची हत्या झाली नाही, असा दावा रणजीत सावरकर यांनी केला. तपास नीट झाला नाही, त्यामुळे गांधी हत्येचा फायदा नेहरू घराण्याला झाला असे सावरकर म्हणाले. फॉरेन्सिक तपासातून आपण हे वक्तव्य करत आहोत असे त्यांनी म्हटले. गांधी हत्येनंतर २० वर्षांनी जसा कपूर कमीशन नेमला तसा दुसरा कमीशन नेमून दडपलेले पुरावे बाहेर काढावेत अशी मागणी त्यांनी केली.

रणजीत सावरकरांचा दावा काय?
७६ वर्षांपूर्वी अशी घटना घडली ज्यामुळे जगाचे राजकारण बदलले, त्याचा डाग सावरकर यांच्यावर लावला गेला. नथूराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केल्याचे सांगितले गेले. मी कपूर कमीशनचा अभ्यास सुरू केला. तो अहवाल काँग्रेस सरकारने नाकारला नाही आणि स्वीकारला नाही. नथुराम गोडसे यांचे क्रॉस व्हेरिफिकेशन झाले नाही. नथुराम गोडसे यांनी मारलेल्या पिस्तुलातील गोळ्यातून महात्मा गांधी यांचा खून झाला नाही. पिस्तुलातून सुटलेल्या गोळीचा आकार वेगळा आहे. मी या सगळ्याचा अभ्यास केला.

२ फुटांवरून अशा गोळ्या मारणे शक्य नाही, मारलेल्या गोळीचा अँगल देखील वेगळा होता.

फॉरेन्सिकचा अहवाल ज्या गोळीबारावर आधारित आहे त्याचा फोटो जोडला आहे.

पोलिसांनी पंचनामे खोटे बनवले आहेत. हे सगळं मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे. पोलिसांनी तपास नीट केला नाही.

नथुराम गोडसे हे गांधी यांना मारायला आले होते हे १०० टक्के खरं, त्यांनी गोळ्या मारल्या हेही १०० टक्के खरं. पण नथुराम गोडसे याच्या पिस्तुलातून मारलेल्या गोळीतून गांधींचा खून झाला नाही.

नंतर या प्रकरणाचा तपास नीट झाला नाही.

गांधी हत्येचा फायदा नेहरू घराण्याला झाला.

हे प्रश्न लोकांनी उपस्थित केले पाहिजेत.

गांधी हत्येनंतर २० वर्षांनी जसा कपूर कमीशन नेमला तसा दुसरा कमीशन नेमून दडपलेले पुरावे बाहेर काढावेत.

मी कुठलाही स्पेकुलेशन करत नाही, मी हे फॉरेन्सिक तपासातून मांडत आहे.

मी केंद्राकडे तपासाची मागणी करणार नाही, ही मागणी लोकांनी करावी.

या संबंधित पुस्तक प्रकाशित होऊ नये यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला. पण मी हे पुस्तक स्वत: प्रकाशित केलं. अनेक प्रकाशकांनी शेवटच्या क्षणी प्रकाशनाला नकार दिला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR