18.2 C
Latur
Wednesday, November 13, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत गणेशभक्तांना रात्रभर दर्शन घेता येणार

मुंबईत गणेशभक्तांना रात्रभर दर्शन घेता येणार

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे दर्शन गणेशभक्तांना घेता यावे, यासाठी बेस्ट उपक्रमाने यंदाही रात्रभर सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. नऊ मार्गांवर २४ अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येणार असल्याची माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली. या बस ७ सप्टेंबर ते १६ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात येणार आहेत तर गेल्या वर्षीही बेस्ट उपक्रमाने शेवटच्या ५ दिवसांत रात्रभर बस सेवा दिली होती. दरम्यान, यंदाही राज्य सरकारच्या सूचनेनुसार दहा दिवस बस सेवा देण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.

त्यामुळे आता मुंबईतील गणेशभक्तांना गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे रात्रभर दर्शन घेता येणार आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्वाची तयारी सार्वजनिक मंडळाकडून जोरदार सुरू आहे. यंदाच्या गणेशोत्वात खड्डे त्याच बरोबर वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना होऊ नये, या अनुषंगाने मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी पहिल्यांदाच नवी मुंबईतून मुंबई विमानतळपर्यंत ग्रीन कॉरीडोर ही संकल्पना आखली आहे. तसेच या ग्रीन कॉरीडोरवरती वाहतुकीचा परिणाम होऊ नये, यासाठी टप्प्याटप्प्यावर अधिक मनुष्यबळ तैनात असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR